“निरामय” म्हणजे सर्वांगीण आरोग्य. W.H.O नुसार आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संपूर्ण शारीरिक आरोग्य, संपूर्ण मानसिक आरोग्य आणि विचारधारेतील उत्कृष्टता आवश्यक असते. प्राचीन परंपरेनुसार समग्र आरोग्य हा जीवनाचा मार्ग आहे. निरामय वेलनेसचा जन्म सर्वांना असे सर्वांगीण आरोग्य देण्यासाठी झाला आहे.
निरामय वेलनेस सेंटरचे संचालक श्री. योगेश चांदोरकर व सौ. अमृता चांदोरकर यांना मूलतः अध्यात्माची आवड होती. प्राणशक्तीची ओळख त्यांना करून दिली, ती त्यांचे गुरुमित्र श्री. प्रद्युम्न वाटवे यांनी. शरीर व मन सचेतन करणारी ‘ऊर्जा’च आरोग्य किंवा अनारोग्यास कारणीभूत ठरते हे सत्य उलगडत गेले.
विनाऔषध-विनास्पर्श दिले जाणारे हे ऊर्जा उपचार आजही अनेकांना गूढ वाटतात. कारण आपण आधुनिक शास्त्रावर पूर्णपणे विसंबलो आहोत. निसर्गोपचारतज्ज्ञ असणारे श्री. योगेश चांदोरकर व सौ. अमृता चांदोरकर यांनी प्राचीन शास्त्रांचा केलेला आधुनिक आविष्कार म्हणजे ‘स्वयंपूर्ण उपचार’. निरामय वेलनेस सेंटरमध्ये असाध्य आजारांवर ‘संजीवनी’ ठरणारे हे स्वयंपूर्ण उपचार रुग्णांना 24×7 मिळतात.
Joined 12 October 2012