Channel Avatar

kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar) @UCt0TRBfCWoNn2YPP0Fi8a7A@youtube.com

9.5K subscribers

प्रॅक्टिस करताना पक्षकारांना कायदेशीर बाबीतून न्याय मिळवून


Welcoem to posts!!

in the future - u will be able to do some more stuff here,,,!! like pat catgirl- i mean um yeah... for now u can only see others's posts :c

kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)
Posted 10 months ago

माझ्या तमाम सबस्क्राईबर, आणि चैनल विवर्स सस्नेह नमस्कार..माझ्या दिनांक ०९/११/२०२५ रोजीच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा.आणि स्नेहाच्या संदेशांबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.तुमच्या समर्थनाने आणि शुभेच्छांनी माझ्या कार्यक्षेत्रातील आनंद वाढला आहे.तुमच्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मनःपूर्वकधन्यवाद!
यापुढेही तुमचे असेच समर्थन,सहकार्य मिळेल अशा बाळगतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद.

4 - 0

kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)
Posted 1 year ago

वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते आणि त्यांना खाण्यासाठी गोडधोड केले जाते. या दिवशी पुरणपोळीचा खास बेत केला जातो. सोमवार २ तारखेला पिठोरी अमावस्येला बैल पोळा सण साजरा करण्यात येईल. या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हे शुभेच्छा पाठवून सणाचा उत्साह वाढवूया.
बैल पोळ्याच्या शुभेच्छा.!

4 - 0

kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)
Posted 1 year ago

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली.या भीषण घटनेने कामाच्या ठिकाणी आरोग्य सेवा कर्मचार्‍यांवर वारंवार होणाऱ्या हिंसाचाराकडे लक्ष वेधले. देशामध्ये महिला मुली कुठे सुरक्षित नाही डॉक्टरांसाठी सुरक्षित कामाच्या परिस्थितीचा अभाव असल्याचे सांगून, भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी देशात आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर प्रकाश टाकला.
१९७३ मध्ये अरुणा शानबाग यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या दुर्दैवी घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांच्यावर झालेला लैंगिक अत्याचार हा कामाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचार्‍यांवर होणार्‍या हिंसाचाराच्या सर्वांत भीषण घटनांपैकी एक आहे. "पितृसत्ताक पक्षपातीपणामुळे, रुग्णांचे नातेवाईक महिला डॉक्टरांवर हल्ले करण्याची शक्यता अधिक असते आणि लैंगिक हिंसाचार होण्याचीही शक्यताही त्यांच्या बाबतीत जास्त असते. अरुणा शानबाग हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे. या प्रणालीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा अभाव आहे," असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेवर काळजी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने अरुणा शानबाग प्रकरणाचा संदर्भ दिला. सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले? अरुणा शानबाग चे हे नेमके प्रकरण काय होते? तेच आपण ह्या व्हिडिओ म्हधून जाणून घेणार आहोत . लवकरच आपल्या भेटीला. जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.

1 - 0