नमस्कार, मी सौ छाया ....बागकाम हा माझा छंद आहे व २० ते २५ वर्ष मी तो जोपासलेला आहे.माझी बाग गच्चीवर आहे त्यामुळे सगळी झाडे कुंड्यांमध्ये आहेत.कुंडी कशी भरावी,मातीमध्ये काय काय घालावे,झाड कसे लावावे,घरच्या घरी खते कशी तयार करावी, बोन्साय कसे करावे,झाडांना विविध आकार कसे द्यावेत, अडेनियम मध्ये ग्राफ्टिंग कसे करावे व झाडांची काळजी कशी घ्यावी जेणेकरून आपली झाडे हिरवीगार व टवटवीत राहतील,भरपूर फुले येतील,किड नियंत्रण कसे करावे ह्यासाठी माझे अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करण्यासाठी मी हे चॅनेल सुरू करीत आहे. बागकामासंबंधी सर्व प्रकारचे व्हिडिओ मी या चॅनेल द्वारा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील.आपल्या सर्वांच्या शुभेच्छा,प्रेम व सहकार्य अपेक्षित आहे.तरी आपण सर्वांनी ह्या चॅनेल ला सबस्क्राईब करायचे आहे.
धन्यवाद.
माझे नंदनवन