शेअर्स चे भाव पडतात तेव्हाच ते विकत घ्यायचे असतात... हे सर्वमान्य समीकरण आहे. मोठेमोठे गुंतवणूकदार श्रीमंतीचं हेच कारण सांगतात "की जेव्हा इतर लोक घाबरून शेअरस विकत असतात..तेव्हाच चांगले गुंतवणूकदार ते विकत घेत असतात".
ऐकायला सोपं वाटतं पण प्रत्यक्षात अमलात आणणे कठीण जाते. कारण भाव कमी म्हणजे नेमका किती कमी ते समजत नाही. आपण शेअर घेतला आणि त्यानंतर लगेचच तो आणखी पडायला लागला...हा अनुभव तर कित्येकांना आलाच असेल !
मित्रहो,
Buy the Dips ही अशी एक स्ट्रॅटेजी आहे जी आपल्याला नेमकेपणाने सांगते की स्टॉक नेमका किती खाली आल्यावर त्यात गुंतवणूक करावी. आणि ते देखील केवळ पाच मिनिटात ! तुम्हाला देखील ही स्ट्रॅटेजी वापरून आपला दीर्घकालीन पोर्टफोलिओ बनवता येईल.
या शनिवारी, ११ ऑक्टोबर २०२५ या तारखेला Buy The Dips ही एक साधी सोपी आणि तरीही परिणामकारक गुंतवणूक स्ट्रॅटेजी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे.
या लिंकवर क्लिक करून अधिक माहिती घ्या -
netbhet.in/BTDS
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
Learn.netbhet.com/
2 - 0
🔥 स्टॉक मार्केट बेसिक्स – मोफत ऑनलाईन कार्यशाळा! 🔥
एक छोटा प्रश्न… तुम्ही कधी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे, पण कुठून सुरुवात करावी हे समजत नाहीये का? 🤔
बर्याच लोकांना संपत्ती वाढवायची असते, पण चुकीच्या माहितीमुळे किंवा भीतीमुळे ते पुढे येत नाहीत. आणि खरी गोष्ट म्हणजे, चुकीचं पाऊल मोठ्या नुकसानीकडे नेऊ शकतं.
स्टॉक मार्केट कसं काम करतं, कोणते धोके असतात आणि यशस्वी गुंतवणूकदार कसे निर्णय घेतात हे समजून घ्यायचं आहे का?
तर, नेटभेट तर्फे आयोजित स्पेशल ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी व्हा आणि स्टॉक मार्केटची मूलभूत माहिती सोप्या मराठीतून जाणून घ्या!
✅ मोफत! ऑनलाईन! मराठीतून! Live!
📆 दिनांक: १० ऑक्टोबर २०२५
⏱ वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
▶ फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग उपलब्ध नाही
🔗 अधिक माहिती आणि नोंदणीसाठी: netbhet.in/SMB
💡 आता संधी गमावू नका! मराठीतून समजावून घ्या आणि स्मार्ट गुंतवणूकदार बना!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
"मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!"
8 - 0
चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूला कौरवांनी कपटाने मारले. यात पुढे असलेल्या जयद्रथाचा दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली. तेव्हापासून जयद्रथ घाबरला. कौरव गटात जयद्रथाला संध्याकाळ पर्यंत वाचवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली.
द्रोणाचार्य सेनापती होते. तेच अर्जुन आणि जयद्रथाचे गुरु देखील होते.
घाबरलेला जयद्रथ रात्री द्रोणाचार्यांच्या तंबूत गेला आणि त्याने द्रोणाचार्यांना विचारले की मी अर्जुनाला कसा हरवू शकतो?
द्रोणाचार्यांनी सांगितले की तुला जिवंत रहायचे असेल तर उद्या अर्जुनासमोर जाऊ नकोस. उद्या त्याला थोपवायचं कसं ते आम्ही पाहू. द्रोणाचार्यांच्या उत्तराने व्यथित झालेला जयद्रथ म्हणाला "गुरुजी मी आणि अर्जुन आम्ही दोघेही तुमचे शिष्य. जशी त्याने धनुर्विद्या तुमच्याकडून शिकली तशीच मीही तुमच्याकडूनच धनुर्विद्या शिकलो. मग असं काय झालं की आज तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे आणि मला त्याच्यापासून लपावं लागत आहे?
www.facebook.com/share/p/16dchcPZC1/
द्रोणाचार्यांनी सांगितलं जयद्रथा, तुम्ही दोघेही माझे शिष्य. मी दोघांनाही समभावानेच शिकवलं. पण तू मी शिकवले ते अंतिम मानून सराव करायचास आणि अर्जुन मी शिकविले ती सुरुवात मानून सराव करायचा. तो त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा, खोलात जायचा, प्रयोग करायचा, त्याचं कधी समाधान व्हायचंच नाही. #netbhet
माझ्याकडील शिक्षण झाल्यावर तू पूर्णपणे राज्यकारभारात गुंतलास. पण अर्जुन इतर अनेक गुरूंकडून शिकतच गेला. नवनवीन अस्त्रे आपल्या भात्यात समाविष्ट करत गेला.
थोडक्यात अर्जुन श्रेष्ठ आहे कारण त्याची शिकण्याची आणि सरावाची जिज्ञासा वाढत गेली आणि तुझी शिकण्याची इच्छा कमी कमी होत गेली.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq?mode=ems_…
येथे क्लिक करा.
================
आता आपण ज्याच्यासोबत लढत आहोत तो अर्जुन माझा विद्यार्थी काही काळासाठी होता...पण तो धनुर्विद्येचा विद्यार्थी कायमचा आहे.
ज्याने शिकणं संपवलं तो संपलाच म्हणून समज !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
15 - 0
बर्नार्ड किविया. टांझानियामधील एक तरुण. त्याचे वडील मेकॅनिक (mechanic) होते, जुन्या गाड्यांचे सुटे भाग विकायचे, आणि आई शिवणकाम (tailor) करायची. घरात नेहमी 'काहीतरी बनवण्याची' प्रक्रिया सुरू असायची—एकजण धातूच्या वस्तूंशी झगडत तर दुसरी कपड्यांना आकार देत असे. कदाचित यामुळेच त्याला लहानपणापासूनच काहीतरी तयार करण्याची प्रेरणा मिळाली.
तो प्राथमिक शाळेत असताना त्याचे शिक्षक विद्यार्थ्यांना एका बिस्किट कंपनीच्या कारखान्यात घेऊन गेले होते. बिस्किटे कशी बनतात, यंत्रे कशी चालतात, पीठ मिसळण्यापासून ते कापून पॅकिंग करण्यापर्यंत—ती सर्व हलणारी यंत्रसामग्री (moving parts) पाहताना त्याला खूप उत्सुकता वाटली. तेव्हापासून तो विचार करू लागला, "अशी यंत्रे लोक नेमकी कशी बनवतात?"तेव्हापासून त्याला यंत्रांबरोबर खेळण्याचं वेड लागलं.
www.facebook.com/share/p/1EqSD9umiq/
२००५ मध्ये, त्याला 'ग्लोबल सायकल सोल्युशन' नावाच्या एका संस्थेकडून काम मिळाले. सायकल दुरुस्त कशी करायची, हे तरुणांना शिकवण्याचे काम त्याच्याकडे होते, जेणेकरून ते शेतकऱ्यांच्या सायकलींची दुरुस्ती करून आपापल्या गावात रोजगार मिळवू शकतील.
याच कामादरम्यान त्याने त्याचे पहिले मशीन तयार केले : पॅडलवर चालणारा एअर कंप्रेसर. विज उपलब्ध नसणे हा नेहमीचाच प्रश्न. त्यावर उपाय शोधण्यासाठी त्याने सायकलच्या तुटलेल्या भागांपासून एक एअर कॉम्प्रेसर बनवला जो सायकलच्या चाकांमध्ये हवा भरण्यासाठी वापरला जाऊ शकेल. त्याने बनवलेले हे मशीन तो मस्तीखोर मुलांना शिक्षा देण्यासाठी वापरायचा ! त्यांनी काही चूक केल्यास, १० मिनिटे पॅडल मारून हवा साठवायची, जी सायकलच्या टायरमध्ये भरण्यासाठी वापरली जाई. सगळ्यांना ते मशीन खूप आवडले!
त्या संस्थेतील सिनिअर सहकारी समंथा हिला बर्नार्ड मधील हे वेगळेपण जाणवले. तिने बर्नार्डला D-LAB च्या एका संमेलनाला जाण्यासाठी सुचवले. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये डी-लॅब (D-Lab) नावाचा एक प्रोग्रॅम आहे. या लॅबमधील मुख्य कोर्स, 'क्रिएटिव्ह कॅपॅसिटी बिल्डिंग', हा जागतिक गरिबीवर (global poverty) व्यावहारिक उपाय (practical solutions) शोधण्यावरकाम करतो. या कार्यशाळेत जगभरातील अशा सर्जनशील व्यक्तीना बोलावले जाते जे गरिबीवर मात करण्यासाठी प्रॅक्टिकल उपाय शोधतात.
बर्नार्डला धड इंग्लिश बोलता येत नव्हते. पुरेसे पैसेही नव्हते. अमेरिकेतील मोठ्या विद्यापीठांतील लोकांमध्ये मी कसा फिट बसणार?" या विचाराने तो आधी नाही म्हंटला. पण तिने बर्नार्डला समजावले, हा जागतिक स्तरावरचा कार्यक्रम आहे. तू जा, काहीतरी शिकशील आणि नव्या लोकांशी भेटशील. तिनेच सर्व कागदपत्रे आणि जाण्यायेण्याची सोयही करून दिली.
तिथे जगभरातून सुमारे ७० लोक तिथे आले होते. प्रत्येकजण त्यांचे शोध (inventions) दाखवत होता. तिथे ग्वाटेमालाचा एक माणूस, कार्लोस, पॅडलवर चालणारा ज्युसर घेऊन आला होता. सायकलच्या भागांशी काम करणाऱ्या बर्नार्डच्या मनात लगेच विचार आला: "हे तर मी माझ्या गावी परत बनवू शकतो!"
तो घरी परतला आणि पहिले काम केले, ते म्हणजे कार्लोसच्या तंत्रज्ञानाची नक्कल (copy) करणे. जुने धातूचे भाग एकत्र केले आणि एका तुटलेल्या इलेक्ट्रिकल ज्युसरचा जग (jug) वापरला. पॅडलवर चालणारा फ्रूट ज्युसर तयार झाला!
लोकांना ते खूप आवडले. येथूनच त्याचा 'जुने भाग वापरून नवीन वस्तू बनवण्याचा' प्रवास सुरू झाला.
प्रत्येक प्रश्नाकडे तो सायकलच्या माध्यमातून हा प्रश्न कसा सोडवू शकतो या दृष्टीने बघतो. कारण तेवढंच त्याला येतं.
टांझानियामध्ये भंगार धातू (scrap metal) जमा करून ते वितळवले जातात आणि त्यातून नवीन धातू बनवतात, पण तो मात्र पुनर्निर्मिती (recycling) करतो. सायकलचे भंगार भाग वापरून त्याने साऱ्या वस्तू तयार केल्या.
खुर्च्या आणि फर्निचर तयार केले.
सायकल चार्जर: सायकलला मोबाईल फोन चार्जर जोडला, ज्यामुळे प्रवासात फोन चार्ज होतो.
पॅडल पंप: नळाचे पाणी येत नाही. म्हणून सायकलच्या भागांपासून एक पंप बनवला. फक्त पॅडल मारायचे आणि विहिरीतून पाणी थेट घरात येते!
सौर वॉटर हिटर: पुनर्वापर केलेल्या साहित्यातून (recycled materials) हिटर बनवला. हा हिटर ७५°C पर्यंत पाणी गरम करू शकतो!
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
असे अनेक जुगाड करून त्याने मशीन्स बनवल्या आहेत. ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य हेच की आपल्याकडे जे आहे त्यातूनच प्रश्न सोडविणे ही खरी क्रिएटिव्हीटी. शिक्षण, पैसा, साधनसामग्री याची मदत होतेच पण क्रिएटिव्हीटी त्याहून अधिक काहीतरी मागते.....वेगळा विचार !!
अशा अनेक जुगाड इनोव्हेशनच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील. भारतातही अशा इनोव्हेटर्सची कमी नाही. पण मी बर्नार्डची कथा मुद्दाम निवडली कारण त्याने केवळ मशीन्स कॉपी केल्या नाही तर इनोव्हेशन मॉडेल पण कॉपी केले.
त्याने केवळ स्वतःपुरता विचार केला नाही. त्याच्या या प्रॅक्टिकल शोधांचा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून त्याने स्वतःच एमआयटीच्या धर्तीवर एक छोटा डी-लॅब सुरू केला आहे. शाळेतील (Standard 5 ते 7) विद्यार्थ्यांना सर्जनशील बनण्यास तो मदत करत आहे.
त्याच्या प्रेरणेतून अनेक गावकऱ्यांनी समस्यांवर स्थानिक आणि सोपे तोडगे शोधले:
फ्रँक मोलेलने हातगाडीतून खत आणि शेण अधिक कार्यक्षमतेने पसरवणारी 'फर्ट कार्ट' बनवली.
जेसी किकलांगेने घरगुती एव्होकॅडो तेल काढण्याचे मशीन बनवले, ज्यामुळे जास्त पिकलेली फळे वाया न जाता तेलात रूपांतरित झाली.
मॅग्रेथ ओमारीने साबण कापण्याचे मशीन बनवून एक छोटी फॅक्टरी सुरू केली आहे, ज्यात अनेक स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे.
इतर शोधांमध्ये एका तासात १०० किलो मका सोलणारे मशीन, प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मधमाशांची पोळी आणि फळे वाया जाऊ नयेत म्हणून बनवलेला मेकॅनिकल ज्युसर यांचा समावेश आहे.
आजपर्यंत, सुमारे ८०० स्थानिक शोधकांना या 'Practical Creativity' चा फायदा झाला आहे.
देणाऱ्याने देत जावे , घेणाऱ्याने घेत जावे ...घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचा हात घ्यावा ! ही उक्ती त्याने प्रत्यक्षात उतरवली.
प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत एडवर्ड डी बोनो म्हणतात ते अगदी खरे आहे: “जी कल्पना प्रत्यक्षात आणली जाऊ शकते, ती केवळ सिद्धांतात असलेल्या कल्पनेपेक्षा खूप जास्त मौल्यवान असते.”
रचनात्मकता ही प्रयोगशाळेत नाही, ती आपल्या दारात असलेल्या साध्या समस्येमध्ये दडलेली आहे.
- बर्नार्डच्या (Bernard Kiwia) कामावर BBC ने एक छोटी डॉक्युमेंटरी केली होती. ती युट्युबवर अवश्य पहा. वर दिलेल्या मशीन्स व्हिडिओ मध्ये पाहता येतील.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
18 - 0
🤖 लिखाणासाठी AI चा वापर करताय ?
मी रूढार्थाने लेखक नाही. पण तरीही नेटभेटच्या व्यवसायासाठी (Content Marketing) मला ऑनलाईन लिखाण करावं लागतं. साहजिकच मी लिखाणासाठी AI टूल्स वापरून पाहिले. AI ला माझ्यासाठी लिहायला सांगितलं पण ते लिखाण फार साधं आणि नीरस होतं. 😔
मग मला समजलं - समस्या AI मध्ये नव्हती, माझ्या दृष्टिकोनात होती! मी AI कडून Efficiency साठी काम करून घेत होतो पण Effective कामाची अपेक्षा करत होतो.
✨ नवा approach: AI चा वापर efficiency साठी न करता, अर्थपूर्ण काम करण्यासाठी करू लागलो.
🏔️ उदाहरणार्थ एखाद्या पर्वतावर चढण्यासाठी रोप-वे उपलब्ध असेल तरीसुद्धा गिर्यारोहक ते वापरत नाहीत कारण त्यांना अर्थ पर्वत चढण्यात मिळतो , वेगाने शिखरावर पोहोचण्यात नाही. मी देखील AI tools चा असाच वापर करायचं ठरवलं.
💡माझी नवी पद्धत :
- जे लिहायचं आहे त्यातील चहुबाजूंच्या मुद्द्यांसाठी AI ची मदत घेतो.
- सुरुवात कशी करावी यासाठी दोन -तीन वेगवगेळे पर्याय AI कडे मागतो.
- लिखाणात अडकलो की AI ला विचारतो "10 वेगळी उदाहरणे दे"
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq?mode=ems_…
येथे क्लिक करा.
================
- त्याचे शब्द copy-paste नाही करत, फक्त ideas घेतो
- आता AI माझा brainstorming partner आहे, लेखक नाही
AI ला वेगाने काम करणारा कामगार म्हणून नव्हे तर अर्थपूर्ण मदत करणारा साथीदार म्हणून वापरा. AI तुमचा partner बनवा, replacement नाही! 🤝
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
15 - 0
OpenAI ने नुकताच Sora 2 हे AI Video Generaterअँप लाँच केले आहे.
आणि हो – हा खाली दिलेला व्हिडीओ १००% AI-Generated आहे.
OpenAI ने या नवीन व्हिडीओ मॉडेल सोबत एक सोशल अॅप लाँच केलं आहे. अगदी TikTok / instagram Reels सारखं – पण प्रत्येक क्लिप AI ने तयार केलेली असेल !
Sora 2 मुळे व्हिडीओ फक्त चांगले दिसत नाहीत, तर ते खरे वाटतात. पात्रं प्रत्येक सीनमध्ये एकसारखी राहतात, आणि आवाज, संवाद, sound effects सुद्धा तयार करतात.
www.facebook.com/share/v/163uQ4p4Fi/
यात आणखी एक भन्नाट फीचर आहे – “Cameos”. एकदा तुम्ही स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, की तुम्ही इतर कुठल्याही AI व्हिडीओत लगेच दिसू शकता.
या नव्या सोशल अँपचं नावही Sora आहे, सध्या US आणि कॅनडात सुरु होत आहे. ते फक्त invite-only आहे आणि मित्रांसोबत व्हिडीओ तयार करणे व remix करणे यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq?mode=ems_…
येथे क्लिक करा.
================
कल्पना करा एक असा सोशल मीडिया जिथे केवळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एकत्र मिळून बनवलेलं AI Video Content असणार. कोणतेही फॉर्वर्डस नाहीत, अखंड स्क्रोलिंग नाही.
👉 तुम्ही अशा नव्या सोशल मीडिया मध्ये join कराल का जिथे सगळं काही AI ने तयार केलेलं आहे?
AI संबंधी नवीन माहिती सोप्या मराठीतून शिकण्यासाठी आम्हाला @Netbhet फॉलो करा.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
7 - 0
साडेतीन टक्क्यांचा नियम !
काही दिवसांपूर्वीच नेपाळ मध्ये सरकार उलथून देणारी हिंसक चळवळ झाली. अनेकांना अशी चळवळ भारतात होईल अशी भीती वाटली आणि अनेकांना अशी चळवळ भारतात व्हावी अशी इच्छा देखील झाली. तेव्हा मला मी वाचलेल्या ३ .५ % च्या नियमाची आठवण झाली. पण वेळेअभावी त्याबद्दल लिहिणे जमले नव्हते. आता लिहितोय.
मानवजातीच्या इतिहासात सत्ताधारी वर्ग आणि सामान्य लोक यांच्यात संघर्ष नेहमीच झाला आहे. हा संघर्ष कधी शांततामय बंद किंवा निदर्शने करून झालेला आहे तर अनेकदा रक्तरंजित युद्धाच्या स्वरूपात दिसला आहे.
हार्वर्ड मधील राज्यशास्त्र अभ्यासक एरिका चेनोवेथ यांनी जगभरातील अशा आंदोलनांचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातूनच त्यांनी "सडे तीन टक्क्यांचा नियम" मांडला आहे.
एरिका चेनोवेथ आणि संशोधक मारिया स्टेफन यांनी १९०० ते २००६ या कालावधीतील जगभरातील राजकीय आंदोलनांचे कठोर विश्लेषण केले.
एकूण आदोलनांपैकी केवळ यशस्वी आंदोलनांचा आणखी अभ्यास केला. त्यांना अशी ३२३ आंदोलने आढळली.
यशस्वी आंदोलनाचे निकषही स्पष्ट होते –
१ . आंदोलनाच्या कृतीमुळे एका वर्षाच्या आत सत्ताबदल झाला पाहिजे.
२ . हा बदल केवळ आंदोलनानेच झाला पाहिजे. परकीय सैन्याने हस्तक्षेप करून सत्ता बदलली, तर ते यश मानले जाणार नाही.
तसेच आंदोलनात स्फोट, अपहरण, मालमत्तेचे नुकसान वगैरे घडले असेल तर ते हिंसक मानले. अन्यथा ते अहिंसक अंदोलन म्हणून मानले.
(भारताचा स्वातंत्र्यलढा अंशतः यशस्वी मानण्यात आला होता. कारण अहिंसक मोहिमेच्या सर्वोच्च बिंदूपासून सत्तापालटाला एक वर्षापेक्षा जास्त अवधी लागला होता. यावरून चेनोवेथ यांच्या संशोधनाचे निकष किती कठीण होते याची कल्पना येते.)
या संशोधनाचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते. चेनोवेथ यांच्या अभ्यासानुसार अहिंसक मोहिमांपैकी सुमारे ५३% वेळा राजकीय बदल साध्य झाले होते, तर हिंसक मोहिमांपैकी फक्त २६% वेळा. आणि अभ्यासातील २५ सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी, २० अहिंसक होती, व त्यापैकी १४ पूर्णपणे यशस्वी ठरली.
म्हणजेच अहिंसक मोहिमा हिंसक मोहिमांपेक्षा दुप्पट जास्त यशस्वी ठरल्या होत्या.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
*यातील काही उदाहरणांचा उल्लेख केलाच पाहिजे.*
- १९८६ मध्ये फिलिपिन्समध्ये घडलेले पीपल पॉवर मूव्हमेंट हा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा. लाखो लोकांनी प्रार्थना, गाणी आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशात शांतपणे आंदोलन केले. फक्त चार दिवसांत काही दशकांपासून सत्तेत असलेले मार्कोस सरकार कोसळले.
- २००३ मध्ये जॉर्जियात घडलेली रोज रेव्होल्युशन ही देखील रक्ताशिवाय झालेली क्रांती होती. आंदोलनकर्त्यांनी संसदेत प्रवेश केला, पण त्यांच्या हातात बंदुका नव्हत्या तर गुलाब होते. हा प्रतीकात्मक क्षण लोकांच्या एकतेचे प्रतिक ठरला.
- १९८० च्या दशकात एस्टोनियामध्ये सिंगिंग रेव्होल्युशन घडली. लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून गाणी म्हणत सोव्हिएत युनियनविरुद्ध आवाज उठवला. हे आंदोलन इतके सामर्थ्यशाली ठरले की शेवटी एस्टोनियाला स्वातंत्र्य मिळाले.
- २०१९ मध्ये सुदान आणि अल्जेरियाचे दीर्घकालीन हुकूमशहा यांना पद सोडायला भाग पाडले गेले – तेही अहिंसक जनआंदोलनामुळे.
सामान्य जनतेला सरकार उलथून लावायचे असेल तर अहिंसक मार्गाने केलेले जनआंदोलन जास्त परिणामकारक ठरेल हे अभ्यासामुळे जगाला कळले. पण अहिंसक आंदोलनच का यशस्वी ठरते याचेही सखोल विवेचन चेनोवेथ यांनी केले आहे.
- नैतिक श्रेष्ठता: हिंसेच्या तुलनेत अहिंसक आंदोलन नैतिकदृष्ट्या अधिक स्वीकारले जाते. सामान्य नागरिक प्रशिक्षित सैनिक नसतात. त्यामुळे हिंसक आंदोलनापासून बरेच लोक दूर राहणे पसंद करतात.
- व्यापक सहभाग: संप, बहिष्कार, शांततामय मोर्चा – यासाठी शरीराने तंदुरुस्त असणे गरजेचे नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटक जसे की वृद्ध, महिला, विद्यार्थी सर्वजण यात सहभागी होऊ शकतात.
- जास्त प्रसार: शांततामय आंदोलनाबाबत उघडपणे चर्चा करता येते, प्रसारमाध्यमांमध्ये जागा मिळते. हिंसक आंदोलन मात्र गुप्तपणे करावे लागते .त्यामुळे त्याचा प्रसार करताच येत नाही.
- सुरक्षादलांवर परिणाम: जेव्हा लाखो निरपराध लोक रस्त्यावर येतात, तेव्हा सैन्यदलातील अनेकांच्या नजरेसमोर त्यांचे कुटुंबीयच येतात. अशा वेळी ते कारवाई करण्यास धजत नाहीत.
या सर्व कारणांमुळे अहिंसक जनआंदोलन यशस्वी होण्याची शक्यता खूपच वाढते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अहिंसक जनआंदोलन यशस्वी होतेच. चेनोवीथ यांनी अहिंसक आंदोलनांच्या अपयशाचीही कारणमीमांसा केली आहे. आणि याबाबतच त्यांनी "साडे तीन टक्क्यांचा" नियम मांडला आहे.
त्यांच्यामते जेव्हा जेव्हा लोकसंख्येच्या किमान ३.५% लोक सक्रिय सहभाग घेतात, तेव्हा तेव्हा अपयशाची शक्यताच संपते.”
फिलिपिन्स, एस्टोनिया, जॉर्जिया – या साऱ्यांनी हा टप्पा गाठला आणि यश मिळवले.
पण १९५० च्या दशकात पूर्व जर्मनीतील ४ लाख लोक सहभागी झालेले आंदोलन अपयशी ठरले. कारण लोकसंख्येच्या फक्त २% लोक सहभागी झाले होते.
२०११ मधील बहारीन येथील उठाव सुरुवातीला मोठा होता, पण पुढे गटांत विभागला गेला आणि त्यामुळे अपयशी ठरला.
लोकसंख्येच्या साडेतीन टक्के लोकांनी जर सक्रिय सहभाग घेतला, आणि हे ऐक्य वर्षभर टिकून राहिले तर सत्तापालट अहिंसक मार्गाने करणे शक्य आहे.
भारताची लोकसंख्या १४५ कोटी आहे. साडेतीन टक्क्यांच्या नियमानुसार जवळपास पाच करोड लोक जेव्हा सत्ताबदलासाठी एकत्र येतील तेव्हा भारतासारख्या देशातही अशी चळवळ यशस्वी होऊ शकेल. परंतु १४५ कोटींची लोकसंख्या एकसंध नाही. ती वेगवगेळ्या भाषा/राज्य/धर्म/जाती यांमध्ये विखुरलेली आहे. आणि जोपर्यंत भारतीय मनाने विखुरलेले राहतील तोवर निर्णायक जनआंदोलन उभारणे भारतीयांना शक्यच होणार नाही.
आपल्याला नेहमी इतिहासात युद्धकथा, लढाया आणि रक्तपात यांच्याच गोष्टी सांगितल्या जातात. पण खरं तर जग बदलणारी मोठी ताकद ही सामान्य लोकांची, त्यांच्या अहिंसक पण ठाम आंदोलनाची आहे.
एरिका चेनोवेथ सांगतात –
“सामान्य लोकच हिंसा न करताही खरे शौर्य दाखवू शकतात. तेच जग बदलतात. पण त्यांना फार कमी वेळा गौरव मिळतो.”
शस्त्र नव्हे – तर दृढनिश्चय, ऐक्य आणि ३.५% लोकांचा सक्रिय सहभाग – हाच जग बदलण्याचा खरा मार्ग आहे.
*सलिल सुधाकर चौधरी*
*नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
17 - 1
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.
या परिस्थितीत तुम्ही काय कराल ?
१ . फ्री पैसे मिळत आहेत म्हणून रस्त्यावर विखुरलेले पैसे जमा करायला सुरुवात कराल
२ . ते पैसे आपले नाहीत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गावर पुढे चालत राहाल
३ . त्या गाडीचे नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांना फोन करून झाल्या प्रकाराची माहिती द्याल
नीट विचार करून स्वतःलाच अत्यंत प्रामाणिकपणे आपण या परिस्थितीत काय केले असते याचे उत्तर द्या. उत्तर दिल्यानंतरच पुढे वाचा.
२०२१ मध्ये कॅलिफोर्नियात प्रत्यक्षात ही घटना घडली होती. भर महामार्गावर अचानक पैशांचा पाऊस पडू लागला. एका गाडीतून एक डॉलर आणि वीस डॉलरच्या नोटांनी भरलेली पोती जात होती, तेव्हा गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि ही पोती खाली पडली. पोती फुटली आणि भरधाव वेगामुळे सगळ्या नोटा हवेत उडाल्या, जणूकाही आकाशातून पैशांचा पाऊस पडत आहे.
हे दृश्य बघून सगळेच अवाक झाले. महामार्गावर ७० मैल प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्यांचे ड्रायव्हर्स अचानक जागेवरच थांबले. त्यांनी गाड्या सोडून धावपळ सुरू केली. हवेत उडणाऱ्या, रस्त्यावर पडलेल्या नोटा गोळा करण्यासाठी सगळेच वेड्यासारखे धावत होते, ओरडत होते.
काही क्षणात महामार्गावर गाड्यांची मोठी रांग लागली. पैसे जमा करण्यात मग्न असलेल्यांना कशाचंच भान नव्हतं. सुदैवाने, या विचित्र घटनेत कुणीही जखमी झालं नाही.
खरं तर, पैसा कुणाला आवडत नाही? पहिल्यांदा मनात फ्री मिळणारा पैसा जमा करण्याचा विचारच बरोबर वाटतो. पण नीट विचार केला तर याचे संभाव्य धोके लक्षात येतील.
भर महामार्गावर मध्येच सोडून दिलेल्या गाडीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली, तर होणारं रस्त्यावर मिळालेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त असेल. शिवाय, रस्त्यात थांबून पैसे गोळा करणाऱ्याच्या गाडीमुळे जर अपघात झाला आणि कुणाचा जीव गेला, किंवा पैसे गोळा करताना त्या व्यक्तीलाच ट्रकने उडवलं, तर काय होईल?
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
पैसा ही जादूई गोष्ट आहे. त्यामुळे पैसा दिसला की दुसरे काहीच विचार लोकांच्या मनात येत नाही. ज्यांनी गाडी रस्त्यावरच बंद करून पैसे गोळा करायला धाव घेतली, त्यांना पोलिसांनी अटक केली आणि गाड्या टो करून नेल्या. त्यांना बसलेला दंड, गोळा केलेल्या पैशांपेक्षा खूप जास्त होता.
पोलिसांनी टीव्हीवर सांगितलं की हा ‘फ्री पैसा’ नाहीये, ही चोरी आहे. नंतर पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे गाड्यांच्या नंबर प्लेट्स आणि पैसे घेणाऱ्यांचे चेहरे CCTV मध्ये रेकॉर्ड झाले आहेत. जर ४८ तासांत पैसे परत केले नाहीत, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यानंतर लोकांनी पैसे परत केले.
वर दिलेल्या तीन पर्यायांपैकी ज्यांनी पहिला पर्याय निवडला ते स्वार्थी आणि चोर आहेत, दुसरा पर्याय निवडला ते प्रामाणिक आहेत आणि तिसरा पर्याय निवडला ते आहेत ते प्रामाणिक आणि आदर्श नागरिक आहेत. आता आपण यापैकी कोण आहोत ते तुमचं तुम्हाला तपासून पाहता आले असेल. आणि आपण मिळूनच आपला देश बनतो हेही लक्षात आलं असेल.
आणखी एक महत्वाचा मुद्दा. आपल्याला नेहमी वाटतं की पैसा हेच अंतिम ध्येय आहे. पण केवळ पैशाच्या मागे धावणं योग्य नाही. जर आपण चांगलं काम केलं, तर पैसा आपोआप येतो. त्यामुळे कामाच्या मागे धावणं जास्त महत्त्वाचं आहे. पण काही लोक पैशाच्या मागे लागतात.
जर तुम्ही चांगलं काम करत राहिलात, तर तुमचं काम बोलतं. पण जर तुम्ही फक्त जास्त पैसा कमावण्याच्या मागे लागलात तर ते काम तुमच्याकडून निघून जायला वेळ लागणार नाही. पैसा ही यशाची अंतिम पायरी नाही, तर ती एक उपलब्धी आहे.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
22 - 0
रॉजर फेडरर हा टेनिस जगातील सम्राट आहे. एक महान टेनिस खेळाडू म्हणून त्याने नाव तर कमावलं आहेच पण त्यासोबत तो एक चांगला माणूसही आहे ....आणि म्हणूनच बहुदा त्याचे चाहते जगभर आहेत. रॉजरच्या त्याच्या गुरुप्रती असलेल्या प्रेमाचे एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं ते नेटभेटच्या वाचकांसोबत शेअर करतोय.
फेडररचे टेनिस स्किल्स लहानपणीच दिसू लागले होते. पण त्याच्यातील क्षमता ओळखून फेडररला तांत्रिक आणि मानसिक पातळीवर जगज्जेता खेळाडू बनविण्याचे काम केले कोच पीटर कार्टर यांनी. पीटर कार्टर हे ऑस्ट्रेलियन खेळाडू होते. सततच्या दुखापतींमुळे त्यांचे टेनिस करिअर रुळावर येत नव्हते. थोडे पैसे कमावून पुन्हा प्रोफेशनल टेनिस कडे वळावे या उद्देशाने त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये एक तीन महिन्यांची कोचिंग असाइनमेंट स्वीकारली. याच वेळी त्यांना फेडरर सापडला आणि पुढे इतिहास घडला.
तीन महिन्यांसाठी सुरु केलेले कोचिंग करिअर हेच पुढे पीटर कार्टर यांचे मुख्य करिअर बनले. रॉजर फेडररला त्याचा प्रसिद्ध बॅकहॅन्ड शिकविण्यात पीटर कार्टर यांचा प्रमुख सहभाग होता. खेळात चांगला असला तरी रॉजर फेडरर एक गरम डोक्याचा खेळाडू होता. लगेच रागवायचा आणि रागाच्या भरात गेमवरील फोकस आणि नियंत्रण दोनीही हरवून बसायचा. पीटर कार्टर त्याला नेहमी मानसिक पातळीवर तयार करण्यासाठी प्रयत्न करत. जर तू स्वतःमध्ये हा बदल केला नाहीस तर तुझे करिअर अपेक्षित उंचीवर न पोहोचता अचानक संपून जाईल असे ते त्याला नेहमी सांगत.
२००२ साली टोरोंटो मध्ये खेळत असताना रॉजरच्या कानावर एक बातमी आली, जिने रॉजर फेडररचे आयुष्य कायमचे बदलून गेले. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका कार अपघातात कोच कार्टर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रॉजर फेडरर ने गंभीरपणे आपल्या खेळाकडे बघायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये कमालीचा बदल झाला.
पुढच्याच वर्षी २००३ मध्ये रॉजर फेडरर पहिल्यांदाच विम्बल्डन मध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकला. आणि पुढे जिंकतच गेला.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq?mode=ems_…
येथे क्लिक करा.
================
पीटर कार्टरचे आई-वडील ऑस्ट्रेलिया मध्ये राहतात. जेव्हा जेव्हा फेडरर ऑस्ट्रेलिया मध्ये खेळला तेव्हा तेव्हा त्याने आपल्या प्रशिक्षकाच्या आईवडिलांना आवर्जून सामन्याची तिकिटे पाठवली. सोबत विमानप्रवासाची तिकिटे, हॉटेल बुकिंग आणि जाण्यायेण्यासाठी कारची देखील सोय केली. कार्टरचे आई वडील मात्र केवळ फायनल असेल तरच जात असत .... आणि ते देखील फेडरर फायनल मध्ये खेळत असला तरच !
जेव्हा जेव्हा फेडरर ऑस्ट्रेलियात जिंकला आहे तेव्हा तेव्हा कार्टरचे आईवडील विशेष पाहुण्यांच्या गॅलरीत बसून सामना पाहात होते. अगदी फेडररच्या निवृत्ती पर्यंत !
आपल्याकडे कितीही कौशल्य असलं तरी गुरु, मार्गदर्शक आणि शिस्त यांचं महत्त्व प्रचंड आहे. फेडररसारखा दिग्गज खेळाडूही आपल्या गुरुंच्या आठवणीने नम्र राहतो आणि त्यांचे ऋण फेडतो.
आपणही आपल्या जीवनात असे प्रश्न विचारायला हवे –
👉 "माझ्या जीवनात कोण मला मार्गदर्शन करतो आहे?"
👉 "माझ्या यशात मला कोणाकोणाची मदत झाली आहे ?"
👉 "मी त्यांच्या प्रती ऋणी आहे का ?"
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट इलर्निग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
27 - 0
हात खिशात गेला
मोबाईल बाहेर आला
चेहरा बघून मोबाईल लॉक आपोआप उघडला
हाताची बोटे सराईतासारखी त्या अँप आयकॉन कडे गेली.
अँप उघडले.
स्क्रोल केले.
एका मित्राने पत्नीसोबत फिरायला गेला होता त्याचे फोटो पोस्ट केले होते.
फोटोला लाईक केलं
अंगठा दाखवून कमेंट केलं
स्क्रोल केलं
एका गोड बाळाचा फोटो दिसला,
एखादी सेल्फी दिसली
आणि त्यासोबत एखादे मोटिव्हेशनल वाक्य.
कुणाचं प्रमोशन झालं होतं.
पुन्हा लाईक केलं
पुन्हा अंगठा दाखविला
दोन ठिकाणी WOW आणि nice असं लिहिलं
पुन्हा स्क्रोल केलं .
एखादं मीम दिसलं .
‘लाईक’ दाबलं.
‘छान’ लिहिलं.
आणखी स्क्रोल केलं:
कॅफे मधील गरमागरम कॉफीचा फोटो,
एका नेत्याच्या हास्यास्पद वर्तनाचा व्हिडिओ,
एक छानसा वेडिंग फोटोशूट,
कुणा अभिनेत्रीचा बोल्ड फोटो,
पुन्हा मीम्स,
जुने जोक्स,
स्पॉन्सर्ड पोस्ट्स.
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल
हळूहळू सगळं काही ऑटोपायलटवर चालतं.
बोटं आपलं काम सुरूच ठेवतात –
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
सरावाची झालेली,
सर्व अवयवांनी पाठ केलेली,
यंत्रमानवासारखी एक हालचाल.
सैनिकांचा तालबद्ध मार्च असतो
तसा सगळ्यांचा चालू असतो ....
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल !
काही काळापूर्वी हे काम करताना आपण सजग असायचो.
मानवी मेंदू इथे काहीच ऑटोमॅटिक करत नव्हता.
मेंदूंला जास्त काहीतरी पाहिजे असायचं :
एखादी नवीन कल्पना,
एक वेगळीच स्टोरी,
एक काळजाला भिडणारी पंचलाइन,
एक थक्क करणारा प्रवास
भावना, कल्पनाशक्ती, आणि व्यक्तिमत्त्वावर चालणारा
तो मानवी कार्यक्रम आता कालबाह्य झालाय.
त्याची जागा घेतलीय अल्गोरिदमने.
आता लक्षवेधी काम करणे गरजेचे नसते
आता केवळ लक्ष वेधणे गरजेचे असते
विचित्र कपडे, नृत्य किंवा हावभावांनी लक्ष वेधून घेता येत असेल
उच्च दर्जाचं कंटेन्ट का तयार करायचं ?
जर एखाद्या मीमने वायरल होता येत असेल तर
चार पानांचा अभ्यासपूर्ण मजकूर का लिहावा ?
इन्फ्लुएंसरचा रीट्विट पुरेसा असेल तर
आकर्षक जाहिरातींवर डोकं का खपवायचं?
चांगल्या कन्टेन्टवर कशाला मेहनत करायची,
जर ते काही क्षणात इंटरनेटच्या अफाट समुद्रात गाडलं जाणार आहे?
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल
या नव्या जगात इतकंच पुरेसं आहे.
जेव्हा “ठीकठाक” पुरेसं असतं, तेव्हा कष्ट आणि खोल विचारांचा उपयोग काय?
माणसांनीही कोणतेही प्रश्न न विचारता या नव्या जगाशी पटकन जुळवून घेतलं आहे.
हा ऑटोमॅटेड प्रोग्रॅम सुरळीत चालतोय.
उरलेलं सगळं अल्गोरिदम बघून घेत आहे.
मेंदू गोठलाय...बोटं चालतायत....
लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल !!
बस...
आता या पोस्टलाही स्क्रोल करा...पुढे जा
काही लोक अर्ध्यावर पुढे गेलेही असतील...
....लाईक. स्क्रोल. कमेंट. स्क्रोल, लाईक. स्क्रोल !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
15 - 1
Netbhet TV
नेटभेट म्हणजे अतीशय सोप्या पद्धतीने रोजच्या जीवनातील साध्या सोप्या टीप्स मराठी आणि इंग्लीश या दोनही भाषांमधुन देण्याचा प्रयत्न करणारे एक संकेतस्थळ
An attempt of Netbhet.com to bring lively, useful and inspirational Marathi content to youtube.
www.netbhet.com
27 October 2011