हंपी - मंदिरे आणि त्यांचा इतिहास l Hampi- world heritage

8 videos • 3,312 views • by Somnath Nagawade या यूट्यूबच्या प्रवासात तुंगभद्रा नदीच्या काठी कोणे एकेकाळी वसलेले वैभवसंपन्न हंपी आम्हाला शूट करून तुमच्या भेटीला घेऊन आलोय . १५ व्या शतकात या राजधानीत आलेल्या पर्शियन राजदूताने तिचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो आजपर्यंत कधी कल्पना केली नाही आणि डोळ्यांनी पाहिलीही नाही अशी ही नगरी. सगळ्या जगात तिला तोड नसावी. आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा या अवशेषांना दिला गेला आहे आणि त्यामुळे त्याचे जतनही उत्तम प्रकारे केले गेले आहे. हे सगळं सांस्कृतिक वैभव, सौंदर्य, महत्व आणि इतिहास आम्ही कॅमेऱ्यात कैद केलाय. तेंव्हा हे सगळे व्हिडिओ पहा आणि सोमनाथ नागवडे या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करून ती घंटी दाबायला विसरू नका . तेंव्हा चला सफारीला - निसर्ग पहा फिरत रहा शिकत रहा आयुष्य सुंदर आहे , मौज मजेत जगत रहा .