Watch :3

Amrutbol Series | अमृतबोल | दररोज सकाळी ८ वाजता

1330 videos • 70,418 views • by Jeevanvidya १ एप्रिल २०२० पासून दररोज सकाळी ८ ते ८.३० सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या प्रबोधनांचे प्रक्षेपण जीवनविद्या मिशनतर्फे विश्वकल्याणासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी, रक्षणासाठी आयोजित केलेल्या, तसेच सतत शुभ आणि सकारात्मक चिंतनात राहता यावे या उद्देशाने चालू झालेल्या विश्वप्रार्थना महाजप यज्ञामध्ये नामधारकांचा सहभाग आणि विश्वप्रार्थनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे ही खरच आनंदाची बाब आहे. विश्वशांतीसाठी सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्मिलेल्या विश्वप्रार्थनेचा जप करणाऱ्यांना बाहेरच्या परिस्थितीची कोणतीही भीती न वाटता उलट सकारात्मकतेचा (super positivity) अनुभव येत आहे. सद्यपरिस्थितीमध्ये सर्वांना घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे रीकाम्या वेळेत विश्वप्रार्थनेसोबतच शुद्ध श्रवण व्हावे, तसेच सद्गुरू स्मरणात दिवसाची सुरुवात व्हावी आणि आपला दिवस, वेळ सत्कारणी लागावा, यासाठी जीवनविद्या मिशन तर्फे Jeevanvidya या YouTube चॅनेल वर दरदिवशी अमृतबोल या मालिके अंतर्गत सद्गुरू श्री वामनराव पै यांची प्रबोधने प्रक्षेपित करताना आम्हाला आनंद होत आहे.