#संत_दुनियादास_महाराज_भजन

304 videos • 2,465 views • by by Sant Devidas Maharaj संदेश गुरु भक्ती : सती मुक्त्यै क्षुद्रं किवान साधतेय । त्रिलौकी मुल्यरत्नेन दुर्लभ: कि तुषोत्कर: प्राचीन काळापासून मोठमोठे संत आपल्या अमोल वाणीने आणि महातेजस्वी लेखणीने जगातील प्राणीमात्रांच्या कल्याणाकरीता उपदेश करीत आले आहेत. सांप्रतच्या काळातसुध्दा ही परंपरा खंडीत झालेली नाही. कांही सत्पुरुष किर्तन भजनांच्याद्वारे लोकांना भक्तीमार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न करतात मात्र ज्याच्या अंतकरणात भाव असतो, श्रध्दा वसत असते, असेच लोक भक्तीमार्गाकडे वळतात. अशाच लोकांना पुढे अभ्यासाने आत्मज्ञानाचा गुप्त मार्ग समजतो. सामान्य मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यात फसलेला असतो. या फेऱ्यातून मुक्ती पाहिजे असेल तर सद्गुरूस शरण गेल्यावाचून गत्यंतर नाही. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी इंद्रिय, मन, बुध्दी अंतर्यामी होणे आवश्यक आहे.उत्कृष्ठ गुरुभक्ती जेव्हा मोक्षालासुध्दा प्राप्त करते, तर मग ती स्वर्गादी रूप तुच्छ फळांना काय प्राप्त नाही करणार ? ज्या रामाने त्रैलोक्याचे साम्राज्य प्राप्त केल्या जाऊ शकते, त्याच्याद्वारे ऐहिक सुख काय दुर्लभ होणार?मूर्तीमंत सद्गुरुचा महिमा थोर आहे. त्यांच्या चरणी वारंवार शरण जाऊन आपला उध्दार करून घ्यावा, त्यांच्या कृपाप्रसादाने पदांच्याद्वारे बोधामृत, भजन रूपाने मानव प्राण्यास, तरुन जाण्यासाठी संत सुलभ मार्ग दर्शवितात. रामनामाचा गजर करून सर्वांची भावना जागृत करतात. वेद, शास्त्र, पुराण पोथी एकाच प्रभूचे गुण गातात. नरदेह प्राप्त झाला तेंव्हा मानवाने जीवास मुक्त करून घेण्यासाठी, परमार्थ साधून जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यावी, अज्ञानी जीव प्रपंच्यांत भांबावून गेलेले, दिशाभूल झालेले, कर्म बंधनात अडकलेले, मनाच्या मागे सैरावैरा पळणारे, पंचविषयाच्या मागे धावणारे, आशेची आग लावून त्यात जळून जाणारे, दुसऱ्याचे गुणदोष पाहणारे, व आयुष्याचे मातेरे करून घेणारे आहेत. मनुष्याचा स्वभाव सर्वांकडे लक्ष देतो, पण आपल्या स्वत:कडे देत नाही.दुसऱ्याच्या डोळ्यातले दिसले कुसळ, स्वतःच्या डोळ्यातील दिसेना मुसळ, दुसऱ्याच्या डोळ्यातील दिसते रती,आपुल्या नेत्रातील दिसत नाही हत्ती, दुसऱ्याच्या डोळ्यातला दिसतो केस, जवळच्या नेत्रातील दिसत नाही वेस, दुसऱ्याच्या डोळ्यातला दिसतो कण, आपुल्या नेत्रातील दिसेनातीन मण, अभिमान सर्व सोंग ढोंग वरपंखी थाट, हे लक्ष्य चौऱ्यांशींत जाण्याचे मार्ग आहेत. सर्वांनी सावध असावे, ब्रम्ह कळून घेण्यास काय हवे, संत समागम वैराग्य अभ्यास, भाव भक्ती दया क्षमा शांती, श्रध्दा विश्वास लिनता, नम्रता, पूर्ण सद्गुरूच्या मंत्राचे चिंतन, अखंड चरणाचे ध्यान, समुळ विसरून जावे देहभान.सर्व विश्वाचा उत्कर्ष व्हावा असे जर वाटत असेल तर त्याला एकच उपाय आहे. आणि तो म्हणजे भक्ती मार्गाची उपासना करून स्वार्थ त्यागपूर्वक जनसेवा करण्याचा प्रयत्न करावा यातच प्रत्येकाचे कल्याण आहे.. जनता जनार्धनास अल्पमतीने सादर केलेले हे पुस्तक तनमनधनपूर्वक सद्गुरूचे चरणी अर्पण करतो. संत दुनियादास महाराज