#संत _देविदास _महाराज _भजन

235 videos • 1,382 views • by Sant Devidas Maharaj संदेश गृहस्थाश्रम धर्मार्थी साधता । योग्याहुनी येई ही श्रेष्ठता || निष्काम योगे प्रपंच खेळता । देविदास म्हणे हीच मुक्तता ॥ माझ्या गृहस्थाश्रमी बंधु भगिनींनो गृहाची थोरवी किती वर्णावी तरी थोडीच आहे. आपण गृहस्थाश्रमी आहात म्हणुन दुबळे होऊ नका, गृहामध्येच महान पुण्य साधु शकते, गृहीच परोपकार घडू शकतो, गृहीच दान धर्म साधते, गृहीच भक्त होऊ शकतो, गृहीच देव ही होता येतें. गृहाची थोरवी प्राचीन संत मालिका दाखवित आहे. सावतामाळी, गोरा कुंभार, कबीर, नरसिंह मेहता, तुकाराम असे किती तरी भक्त गृहामाजीच निपजले. यावरुनच दिसून येते की गृह हेच एक आदर्श उंच दृष्टीला पोहचण्याचे एक साधन आहे, म्हणून गृहस्थाश्रमीच महान श्रेष्ठता येऊ शकते, म्हणून आपण दुबळे न होता, न्याय निती धर्मातून गृहस्थाश्रम साधावा. माझे नच प्रभू हे काही। प्रपंच अर्पितो तुझेच पायी॥ या म्हणी प्रमाणे जर प्रपंच साधला तर योग्याच्याही वरचे स्थान आपणास लाभु शकते. गृहगीतेचे हेच रहस्य आहे कि आपल्या गृहामध्येच परमेश्वराला बोलाऊ, आपले जीवन कृतार्थ करू, हेच गृहगीता सांगत आहे. गीतेचे अनुकरण जो करील त्यास खरोखरच सुख शांतीची प्राप्ती होईल व ईश्वरीय साथ मिळुन जिवन कृतार्थ होईल. जय गुरुदेव, देविदास महाराज