मनाली हिमाचल प्रदेश | Manali Trip | Himachal Pradesh

13 videos • 66 views • by Pranay Vangule मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर आहे. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, उत्तुंग देवदार वृक्ष, जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह, थंड व आल्हाददायक हवामान यांमुळे मनाली हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे. महाभारतकार व्यासांची तपोभूमी, तसेच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्यस्थान म्हणून मनाली भोवती अनेक पौराणिक आख्यायिका, गुंफलेल्या आढळतात. येथील हिडिंबा मंदिर, हिर्मादेवीचे धूंग्री मंदिर, नजीकचे मनुमंदिर या सर्व वास्तुसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात. मणिकरण साहिब हे हिंदू आणि शीखांचे तीर्थक्षेत्र आहे. हिंदूंचा असा विश्वास आहे की मानवाच्या पूर्वज मनूने मोठ्या प्रलयानंतर मणिकरणमध्ये पुन्हा जीवन निर्माण केले. त्यामुळे हे ठिकाण पवित्र स्थान मानले जाते. येथे अनेक मंदिरे आणि गुरुद्वारा देखील आहेत.