' शुभ रंगवली ' चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे.....
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक - कला आहे. संस्कृत भाषेत रांगोळीला ' रंगवली ' म्हटले जाते.
भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्व आहे.
सण, उत्सव, मंगळसमारंभ, पूजा, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडीत आहे . रांगोळी ही एक कला आहे. देवघर, अंगण , उंबरठा तसेच तुळशी जवळ रांगोळी काढली जाते.
संस्कार भारती रांगोळी पासून अगदी ठिपक्यांची रांगोळी , फुले पाणाची रांगोळी, सोप्या, झटपट आणि लेटेस्ट रांगोळी डिझाईन ' शुभ रंगवली ' चॅनल वर असणार आहेत .तुम्ही त्या सहजरीत्या पाहू आणि काढू शकता.
पण रांगोळी आवडली की लाईक , शेअर आणि कमेंट करायला विसरू नका
'शुभ रंगवली' चॅनलला भेट दिल्या बद्दल धन्यवाद...